Monday, February 16, 2009

संपवून टाक पेग

चाल : मालवून टाक दीप

संपवून टाक पेग, पाजवून घोट घोट
बेवड्या किती दिसांत, लागले सुरेस ओठ

ह्या इथे नसानसात, झिंगते अजून रात
हाय! तू गमावलीस एवढ्यात का विकेट?

गार गार ह्या हवेत, उष्ण उष्ण घोट घेत
मोकळे करून टाक एक एक ग्लास ’नीट’

दूर दूर ह्या पबात, बैसलो निवांत पीत
सावकाश लोचनांनी बार नर्तिकेस लूट

हे तुला कधी कळेल? मद्य ना मला चढेल
लागते खरेच काय? सांग नाविकास बोट

काय हा तुझाच र्‍हास, एवढ्यात तू खलास
ऊठ रे अता भरेल, पापडावरीच पोट

बेवड्या किती दिसांत लागले सुरेस ओठ

4 comments:

सर्किट said...

आवड्या. :-)

"लागते खरेच काय? सांग नाविकास बोट" >> HHPV!!

अभिजीत दाते said...

jabari aahe re..!

Unknown said...

sundar jamlee aahe :)

vivek said...

हेहेहे. आवडली. वाचून एकदम टाईट झालो. नाविकाला बोट लागली :-)