प्रेरणा : मनोगत वरचे भोमेकाकांचे विडंबन - आताशा मी फक्त बकाणे चिवड्याचे भरतो
विषय : चावून चोथा झालेला.. म्हणजेच नवी बाटली जुना माल :)
तरीही विडंबन करायचे कारण : विषयाला
आताशा मी फ़क्त बकाणे चकण्याचे भरतो
प्याले भरणार्या वेटरला लगेच थांबवितो
वास नको मज कुठलाही अन भास नको आहे
बॉटल कसली मुळात मजला ग्लास नको आहे
ह्या मद्यांशी अवघ्या परवा करार मी केला
मी प्यावे ना त्यांना; त्यांनी पिऊ नये मजला
विवाहनामक बेडीमधला कैदी घाबरतो
आता आता बाटली केवळ औषध साठवते
द्राक्षे बघता वाईन नाही, 'आसव' आठवते
आता कुठल्या दिलखुष गप्पा उनाड मित्रांशी
आता पार्टी पूर्वीगत ना रंगीत नि हौशी
उद्विगतेने दारूवरची गीते मी रचतो
खाते जेव्हा सतत बायको नवर्याचा भेजा
उडून जाती स्पिरिटप्रमाणे पेल्यातिल मौजा
बारा महिने दारी श्रावण, येतो मुक्कामा
हरेक दिन मग ड्राय डे परी, सुका नि रिक्कामा
पिण्याविना मी; बिनपाण्याची मासोळी होतो
आताशा मी फ़क्त बकाणे चकण्याचे भरतो
1 comment:
जे आपल्याला आवडते ते इतरांपर्यंत पोहचले पाहीजे.
असा लहानसा प्रयत्न आहे.म्हणूनच मला वाटते .
की तू सूद्धा आमच्या अड्डयात सामील व्हावे .
एकदा येऊन पहा आमच्या ब्लोग अड्डयावर (www.blogadda.com)
Post a Comment