Monday, October 8, 2007

माकडाचा मोबाईल

माकडाचा मोबाईल - एक बालगीत

एक माकड घेऊन आले एकदा मोबाईल
कलरफुल डिस्प्ले होता, लेटेस्ट होती स्टाईल

स्कीनसेव्हर त्याचा होता बाल हनुमान
रींगटोन म्हणून सेट केले जंगलबुकचे गान

माकड पुसे वापरायचाय का तुम्हाला हा फोन
एका कॉलला तीन रुपये एस. एम. एस. ला दोन

दुसऱ्या जंगलात फोन करायला पडेल ज्यादा दर
रोमिंग तेवढे घेतले नाहीये, उगा खर्चात भर

अस्वल म्हणे वाट बघत असेल माझी हनी
फोन करतो 'आलोच मी' काढुन ठेव हनी

मनी आली मिशा चाटत घेउन पैसे नवे
'डायल ए मिल्क' कॉल करुन सांगते दूध हवे

कोल्हा म्हणला माकडदादा होतेय फार बोअर
एस.एम.एस. करुन मागवा जरा क्रिकेटचा स्कोअर

ससा मागे शर्यतीसाठी एकदाच फोन उधार
अलार्म सेट करुनच झोपेन यंदा मीच जिंकणार

कुत्रा बोले शेपुट हलवत सांगु का खरंच
आयडीआ का घेतलेस भाऊ, वापरुन बघ ना हच

इतक्यात आले वाघोबा डरकाळी फोडत
पळती सारे सैरावैरा आरडा ओरडा करत

माकड बोले घाबरु नका! पळताय काय असे?
युक्ती ऐसी करतो आता वाघोबाही फसे

हळुच त्याने बंदुकीचा ठो ठो रिंगटोन लावला
घाबरुन तेथुन वाघोबाने लागलीच पळ काढला

वाघोबाची फजिती बघुन हसु लागला जो तो
माकड म्हणले नीट बसा काढू छानसा फोटॊ
माकड म्हणले नीट बसा काढू छानसा फोटॊ

9 comments:

स्नेहल said...
This comment has been removed by the author.
Unknown said...

haay milya, khup chaan aahe makdacha mobile :)

कोहम said...

wah chaan

avadale baalageet

Anonymous said...

mastta aahe re...mi ekdam chaal vagaire laaun mhanun paahila...ajun bhari vaatla vachayla! :-)

मिलिंद छत्रे said...

मोनिका, कोहम, तिउ खूप खूप धन्यवाद

संदीप चित्रे said...

Very nice, Milind. Writing anything for children is really tough :)

Anonymous said...

makadacha mobile he bal geet farach chhan aahe.
mukhya mhanaje sadhya mobile baddal mothya mansanpekshya lahan mulanna jast mahiti aaste tyamule geeta til sarva goshti lahan mulanna kaltil.

vivek said...

मायबोलीच्या "विचारपूस" वरुन तुझ्या ब्लॉगचा पत्ता मिळाला. या बालगीताने लगेच लक्ष वेधून घेतलं. याचं मस्त गाणं होईल असं वाटतंय. कधीतरी प्रयत्न करुन पाहीन. (तुझी हरकत नसल्यास)

मी अजून एकही बालगीत केलेलं नाहिये. माझा तो प्रांत नव्हे अशी माझी ठाम समजूत आजही आहे. But I need to come out of my comfort zone sometime. बालगीत हा फार कठीण संगीतप्रकार आहे (आणि म्हणूनच तो फार थोड्याजणांना समर्थपणे हाताळता आलाय. खळेसाहेबांचा नंबर पहिला त्यात)

तू गंभीर लिखाण करतोस का ? म्हणजे गझल वगैरे ?

Unknown said...

khupach Chan!!!!!