मूळ गझल माझीच गझल पाठीमागे
सरदाराचे ’हात’ बांधले पाठीमागे
स्वत:च डावे उलटे पडले पाठीमागे
जरा कुठे तो शाहिद विद्येसोबत दिसला
पेव कसे अफवांचे फुटले पाठीमागे
पाठ फिरविली तिने जरी माधुरी प्रमाणे
केस मोकळे हाय सोडले पाठीमागे
लाडिक हसुनी मला आपल्या घरीच नेले
अन गेल्यावर श्वान सोडले पाठीमागे
’वॉल’ खरे तर जगात साऱ्या अभेद्य होती
फक्त पोपडे का मग उरले पाठीमागे
पळता भुइ का थोडी झाली विरोत्तमांना
श्रीलंकेचे वाघ लागले पाठीमागे
थोबड्यावरी डाग तिच्या पण पसंत केली
ठेवून गेला बाप बंगले पाठीमागे
भकारातही 'ह्यांच्या' होता एक दिलासा
त्यात तरी ’हे’ नाही पडले पाठीमागे
जीवनभर तर त्याने माझी सोबत केली
मी गेल्यावर मद्य सांडले पाठीमागे
Friday, August 1, 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
2 comments:
परत पाठीमागे>> वा पाठीमागून जर का तू एवढं उत्तम लिहितोयस तर पुढून काय होईल?? अतिशय आवडलय मला (आणी समजलय ही..:) )
दीप : धन्यवाद
Post a Comment