Sunday, September 6, 2009

इतकेच मला जाताना

प्रेरणा : गुरुवर्य सुरेश भटांची गझल इतकेच मला जाताना सरणावर कळले होते

इतकेच मला जाताना परदेशी कळले होते
’माय नेम इज खान’ म्हणूनच गोर्‍याने छळले होते

ही मिडिया हपापलेली फुकटात बरळली नाही
मी बहर इथे पैशांचे भरपूर उधळले होते

मी लबाड इतका आहे हे सांग कुणा कळले का?
मी पैसे ’कोल्ह्याकडुनी’ आधीच उकळले होते

त्या माजी राष्ट्रपतींची मी उगाच नक्कल केली?
लावून दिवे अंबर का हे कधी उजळले होते?

स्टंट नव्हे तर प्रथाच ही चंदेरी दुनियेमधली
अफवांच्या शिळ्या कढीला मी फक्त उकळले होते

माघारी आल्यावरती मी शब्द फिरविले सारे
करणार काय लोकांचे जर पित्त खवळले होते?

झालेल्या नामुष्कीला सारेच चला विसरू या
पाऊल घसरले होते डोकेही चळले

ही हझल मायबोली गणेशोत्सवात ऐकता पण येईल

5 comments:

सिद्धार्थ said...

"इतकेच मला जाताना परदेशी कळले होते
’माय नेम इज खान’ म्हणूनच गोर्‍याने छळले होते..."

वा बुवा!!!

मिलिंद छत्रे said...

dhanyavaad siddhartha

vivek said...

झकास रे भिडू. तुझ्या खर्जातल्या आवाजात ऐकताना अजूनच धमाल आली. :-)

Suryakant Dolase सूर्यकांत डोळसे said...

मिलिंद,
मित्रा अत्यंत अप्रतिम विडंबन !!
अभिनंदन.

मिलिंद छत्रे said...

धन्यवाद विवेक आणि सूर्यकांती